महाडमध्ये भीषण अपघात

By Admin | Updated: June 21, 2015 01:36 IST2015-06-21T01:36:06+5:302015-06-21T01:36:06+5:30

गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रसायनांच्या टँकरला ओव्हरटेक करणारी एसटी बस समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळून झालेल्या तिहेरी भिषण अपघातात

Fatal accidents in Mahad | महाडमध्ये भीषण अपघात

महाडमध्ये भीषण अपघात

महाड : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रसायनांच्या टँकरला ओव्हरटेक करणारी एसटी बस समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळून झालेल्या तिहेरी भिषण अपघातात एक जण जागीच ठार तर दोन्ही बसमधील एकूण ४६ प्रवासी जखमी झाले. महामार्गावर महाड शहरानजिक गांधारपाले गावच्या हद्दीमध्ये शनिवारी स. ९. ४५ वा. च्या सुमारास घडला. अपघातातील टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला.
जखमींवर महाडच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून गंभीर जखमींना मुंबईतील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातात संजय जोगळेकर (रा. माणगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, ते महाड आगारात लेखापाल म्हणून सेवेत होते.
एक तासानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त दोन्ही बसेस बाजूला काढण्यात आल्या. त्यावेळी त्यांचा मृतदेह बसखाली पडल्याचे आढळून आले.
ठाणे-चिपळूण आणि गुजरकोंड-भार्इंदर या एसटी बसेस समोरासमोर ठोकल्या. बहुतांश प्रवासी हे महाड शहर व परिसरातील आहेत. अपघाताची घटना समजताच पोलीस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Fatal accidents in Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.