गिरणी कामगारांचे मुख्यमंत्र्यांच्या दालनात उपोषण
By Admin | Updated: October 8, 2016 04:59 IST2016-10-08T04:59:48+5:302016-10-08T04:59:48+5:30
गिरणी कामगारांच्या घरांची सोडत ९ मे २०१६ रोजी काढण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिले होते.

गिरणी कामगारांचे मुख्यमंत्र्यांच्या दालनात उपोषण
मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांची सोडत ९ मे २०१६ रोजी काढण्यात येईल, असे आश्वासन गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी दिले होते. मात्र घरांच्या सोडतीबाबत अद्याप काहीच हालचाल करण्यात आलेली नाही. घरे तयार असूनही सोडत काढण्याबाबत काहीच कार्यवाही केली जात नाही. या वेळखाऊ धोरणामुळे संतप्त झालेल्या गिरणी कामगारांनी गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेतृत्वाखाली १८ आॅक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या दालनात उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांनी दिली. (प्रतिनिधी)