शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मराठा आरक्षणासाठी मुंबईत २० जानेवारीपासून उपोषण; मनोज जरांगे यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2023 05:45 IST

आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड ( Marathi News ): मराठा आरक्षणासाठी २० जानेवारीपासून आपण मुंबईत आझाद मैदानावर उपोषण करणार असून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बीड येथील सभेत जाहीर केले. लाखो मराठा बांधव मुंबईत येणार असतील, तर त्यांना कसे अडवणार, असा सवालदेखील त्यांनी यावेळी विचारला.   

मराठा आरक्षणासाठी समाजाच्या वतीने राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. या पार्श्वभूमीवर २३ डिसेंबर रोजी बीड येथील पाटील मैदानावर निर्णायक इशारा सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे यांनी आरक्षण मिळेपर्यंत शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. शांततेचे ब्रह्मास्त्र सर्वांत मोठे आहे. स्वत:च्या लेकराला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनात शांततेत सहभागी व्हा. आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटायचे नाही, असे जरांगे म्हणाले. 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, सारथी, महामंडळाला बजेट द्या; तरच तुमचं आमचं जमणार, असे जरांगे यांनी राज्य सरकारला सभेतून सूचित केले. 

मुंबईला जाण्याची हौस नाही...

आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही. जनभावना लक्षात घ्या. ३ महिने, ४० दिवस; नंतर दोन महिने व नंतर २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला. आम्ही सहन तरी किती दिवस करायचे? असा सवाल जरांगे यांनी केला. आंतरवालीपासून मुंबईपर्यंत मराठा समाज मला भेटायला मुंबईत येणार. तीन कोटींपेक्षा जास्त समाज मला भेटायला येणार. खाण्याची व पांघरायची व्यवस्था आम्ही आमची करू; फक्त प्रसाधनगृहांची सोय तेवढी करा, असे ते म्हणाले. मंत्री छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत जरांगे म्हणाले, सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी. त्याचंच ऐकू नका; नाहीतर जड जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

तोपर्यंत संयम राखावा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सर्वोच्च न्यायालय २४ जानेवारीला क्युरेटिव्ह पिटीशन ऐकणार आहे. आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी हा फार मोठा दिलासादायक निर्णय आहे. वकिलांची फौज  सरकारची बाजू न्यायालयात मांडेल. त्रुटी दूर केल्या जातील. राज्यात कायदा सुव्यवस्था, शांतता राहिली पाहिजे. आरक्षण मिळावे ही सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे कोणीही घाईगडबडीने निर्णय घेऊ नये. संयम बाळगावा. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कोणी आरे म्हटले तर कोणीतरी कारे करणारच आहे. छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही. सर्वोच्च न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेतल्याने दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, अशीच आमची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालय अडथळा दूर करेल. - छगन भुजबळ, मंत्री.

 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेChhagan Bhujbalछगन भुजबळ