.. तर नागपूर- मुंबई महामार्गाला तीव्र विरोध
By Admin | Updated: July 7, 2016 18:49 IST2016-07-07T18:49:10+5:302016-07-07T18:49:10+5:30
प्रस्तावित नागपूर- मुंबई महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र ज्या अमरावती -आध्र पॅटर्ननुसार लॅड पुलींग योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या जमीनी संपादन करण्याचा प्रस्ताव आहे.

.. तर नागपूर- मुंबई महामार्गाला तीव्र विरोध
ऑनलाइन लोकमत
जालना, दि. ७ : प्रस्तावित नागपूर- मुंबई महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र ज्या अमरावती -आध्र पॅटर्ननुसार लॅड पुलींग योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या जमीनी संपादन करण्याचा प्रस्ताव आहे. त्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. जर शेतकऱ्यांना नवीन २०१३ च्या भूमी अधिगृहन कायद्यान्वे एक रक्कमी, बाजार भावाच्या चार पटीने मोबदला मिळाला नाही. तर या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध राहणार असल्याची भूमीका शेतकरी हक्क व बचाव कृति समितीच्यावतीने गुरूवारी पत्रकार परिषदेत मांडली.