शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

स्वखर्चातून बंधारा बांधणारा शेतकरी शासनदरबारी उपेक्षित !

By admin | Updated: July 28, 2016 19:36 IST

महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रेरणा घेवून चार लाख रुपर्ये खर्च करीत बंधारा बांधणारा शेतकरी शासन दरबारी उपेक्षीतच आहे.

जळगाव जामोद : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची प्रेरणा घेवून चार लाख रुपर्ये खर्च करीत बंधारा बांधणारा शेतकरी शासन दरबारी उपेक्षीतच आहे. शासन प्रशासनाने या शेतकऱ्याची काहीही दखल न घेतल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम आसलगाव बाजार येथील शेतकरी उल्हास माहोदे यांनी स्वत: ४ लाख रूपये खर्च करून सिमेंट बंधारा बांधला. ज्यामध्ये आज मुबलक पाणी साठले व या शेतकऱ्यासह आजुबाजुच्या शेतकऱ्यांच्या विहिरींनाही त्याचा फायदा जाणवू लागला आहे.

केवळ ४ हेक्टर शेती असणाऱ्या या शेतकऱ्याने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केलेला ह्या दिव्य प्रयत्नाने शेतकरी मात्र आर्थिकदृष्ट्या पुर्णत: खचून गेला आहे. दुसरीकडे जलयुक्त शिवार योजनेत कोट्यावधी रूपये खर्च होतात. त्या कामात गुणवत्ता दिसत नाही तरीही बिले काढली जातात. मात्र स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या शेतकऱ्यालाही सदर कामाचा प्रस्ताव पाठवून बांधकामाचे पैसे जलयुक्तमधून मिळाले असते तर निश्चितच अशा प्रेरणादायी शेतकऱ्याचा उत्साह वाढला असता. परंतु या शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी, असा प्रयत्न प्रशासनाकडून झाला नाही, एवढे खरे.

आज रोजी पावसाने हा बंधारा तुडूंब भरला आहे. आसलगाव-धानोरा रस्त्यावर असलेला हा बंधारा अनेकांचे लक्ष वेधून घेतो. आणि इतरही शेतकरी या शेतकऱ्याची प्रेरणा घेवून जातात. लोकमतने याबाबत प्रसिध्दी दिल्यानंतर भरपूर शेतकऱ्यांनी या बंधाऱ्याला भेटी देवून माहोदेंचा उपक्रम जाणून घेतला. तर अनेकांनी प्रेरणा घेवून स्वयंप्रेरणेने कामेही केली. या बंधाऱ्याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी माहोदे यांना मार्गदर्शन केले. व त्यांचा उत्साह वाढवला तर शेतकऱ्यांना प्रेरणादायी चित्रफीत बनविण्यासाठी प्रशासनाकडून चित्रीकरणही करून घेतले. परंतु अशाप्रकारे लाखो शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा शेतकरी मात्र आर्थिक मदतीपासून वंचीत राहिला आहे.हा सिमेंट बंधारा मी स्वयंप्रेरणेने बांधला. पाणी टंचाईवर मात करता यावी त्यासाठी एवढे धाडस केले. अनेक शेतकऱ्यांनी भेटी देवून कामाची प्रेरणा घेतली. शासनाकडून आर्थिक मदत मिळाल्यास निश्चितच मला स्फुर्ती मिळेल व त्या निधीमधून सुध्दा असेच प्रेरणादायी काम करेल.- उल्हास महादेवराव माहोदे,शेतकरी आसलगाव बाजार.