शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे चला!
By Admin | Updated: December 11, 2015 00:33 IST2015-12-11T00:33:31+5:302015-12-11T00:33:31+5:30
शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि भरीव आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारची उदासीनता धक्कादायक आहे

शेतकरी कर्जमाफीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे चला!
नागपूर : शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि भरीव आर्थिक मदतीचे पॅकेज देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारची उदासीनता धक्कादायक आहे. अवघ्या वर्षभरात ३००० शेतकरी आत्महत्या झाल्यानंतरही यंदा महाराष्ट्राला केंद्राकडून फुटकी कवडीही मिळाली नाही.
केंद्रीय पथकांकडून दुष्काळ पाहणीचे केवळ ‘फार्स’ झाले. यातून महाराष्ट्राची केंद्राकडे पत राहिलेले नाही, हे स्पष्ट होते. पंतप्रधान तुमचे ऐकत नसतील तर राज्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासाठी वेळ मागावी. आपण आजच्या आज दिल्लीला जाऊन महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून एकित्रतपणे शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना व अपेक्षा पंतप्रधानांच्या कानावर घालू आणि आर्थिक पॅकेजसाठी सहकार्याची मागणी करू, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विखे पाटील यांनी विधानसभेमध्ये हे आवाहन केले. विखे पाटील म्हणाले, व्यापाऱ्यांसाठी एलबीटी माफी करायला सरकारकडे पैसा आहे. कारमालकांसाठी टोल माफी करायला पैसा आहे. तर मग शेतकरी कर्जमाफीसाठीच सरकार एवढे उदासीन का? (प्रतिनिधी)