घुसर येथे शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: July 19, 2016 18:14 IST2016-07-19T18:14:04+5:302016-07-19T18:14:04+5:30
अकोला येथून जवळच असलेल्या घुसर येथील एका शेतक-याने सततच्या नापिकीला कंटाळून विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.

घुसर येथे शेतक-याची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
घुसर, दि. 19 - अकोला येथून जवळच असलेल्या घुसर येथील एका शेतक-याने सततच्या नापिकीला कंटाळून विषारी द्रव्य प्राषण करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
येथील शेतकरी दिपक देवराव गोपनारायण वय ४० यांचे घुसर शिवारात सामायीक कुटुंबाचे पावणे दोन एकर शेत आहे. गेल्या तीन वर्षापासून सततच्या नापिकीला ते कंटाळले होते. त्यांनी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतले होते. पण नापिकीमुळे कर्जाची परतफेडही त्यांना वेळेवर करता आली नव्हती. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.