बियाणे न उगवल्याने शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: June 30, 2016 00:42 IST2016-06-30T00:42:00+5:302016-06-30T00:42:00+5:30

अकोला जिल्ह्यातील घटना.

Farmer's suicide due to non-crop failure | बियाणे न उगवल्याने शेतक-याची आत्महत्या

बियाणे न उगवल्याने शेतक-याची आत्महत्या

सायखेड (जि. अकोला) : तीन आठवड्यांपूर्वी हवामानाच्या अंदाजाला अनुसरून पाऊस चांगला येण्याच्या आशेने शेतात धूळपेरणी केली, परंतु पावसाअभावी धुळपेरणी वाया जाणार यामुळे नैराश्य आलेल्या शेतकर्‍याने २८ जून रोजी शेतातच विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना बार्शिटाकळी तालुक्यातील पुनोती बु. शिवारात घडली.२
महादेव प्रल्हाद राठोड (३५) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. पुनोती बु. शेतशिवारात त्यांची ७0 गुंठे सामायिक शेती होती. सतत तीन वर्षे दुष्काळ, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत ते वावरत होते. यावर्षी चांगल्या पावसाचे संकेत मिळाल्याने त्यांनी धूळपेरणी केली होती. परंती पावसाला उशिर झाला आणि पेरणी केलेले बियाणे उगवले नाही, यामुळे नैराश्य आलेल्या महादेवने शेतातच विष प्राशन करून जीवन संपविले, अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली.

Web Title: Farmer's suicide due to non-crop failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.