नंदुरबारमध्ये चिनोदा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: January 16, 2017 18:53 IST2017-01-16T18:41:17+5:302017-01-16T18:53:13+5:30
तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली़.

नंदुरबारमध्ये चिनोदा येथील शेतकऱ्याची आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 16 - तळोदा तालुक्यातील चिनोदा येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली़. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली़ यामुळे तळोदा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चिनोदा ता़ तळोदा येथील अंबालाल गिरधर पाटील (४०) यांना गेल्या काही वर्षात शेतात आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. तसेच पिकांना भाव मिळत नसल्याने आर्थिक तंगीचा सामना करावा लागत होता़, यातच त्यांनी दोन वर्षांपूर्वी कर्ज काढून नवा ट्रॅक्टर खरेदी केला होता़. या ट्रॅक्टरच्या व्यवसायातही नुकसान झाल्याने ते अडचणीत आले. ट्रॅक्टरचे हफ्ते थकण्यास सुरूवात झाली होती़. यामुळे फायन्सास कंपनीने ट्रॅक्टर जमा करून घेतल्याची माहिती आहे़. या बाबीला कंटाळून रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली़. मयत अंबालाल पाटील यांचे भाऊ सावकार पाटील हे सोमवारी सकाळी शेतात गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली़. याबाबत तळोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद आहे़ (वार्ताहर)