बुलडाण्यात शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: October 17, 2016 02:15 IST2016-10-17T02:15:09+5:302016-10-17T02:15:09+5:30

सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे हताश झालेल्या शेतक-यांने विष प्राशन करुन आत्महत्या केली.

Farmer's suicide in Buldhana | बुलडाण्यात शेतक-याची आत्महत्या

बुलडाण्यात शेतक-याची आत्महत्या

बुलडाणा, दि. १६- सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या शेतकर्‍याचा अखेर शनिवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मोहन हरिदास राठोड (रा. करवंड, ता.बुलडाणा) असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे. राठोड यांच्याकडे चार एकर शेती होती. यावर्षी त्यांनी सोयाबीन व कपाशीची पेरणी केली मात्र अवकाळी पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना नैराश्य आले होते. या नैराश्यातून त्यांनी १२ ऑक्टोबर रोजी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Farmer's suicide in Buldhana