शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शेतकऱ्याचा पीकविमा अधांतरी

By admin | Updated: July 31, 2016 01:03 IST

विमा योजनेसाठी महसूल खात्याचे मिळत नसलेले सहकार्य, बँकांची उदासीनता यांमुळे शेतकरी विमा योजनेपासून दूर असल्याचे चित्र

इंदापूर : ऐन पावसाळ्यात तेल्या रोगाच्या थैमानाने उद्ध्वस्त झालेल्या डाळिंब बागा, महाराष्ट्र शासनाच्या हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी महसूल खात्याचे मिळत नसलेले सहकार्य, बँकांची उदासीनता यांमुळे शेतकरी विमा योजनेपासून दूर असल्याचे चित्र आहे, तर कृषी विभाग केवळ उद्दिष्ट गाठण्याची घाई करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. इंदापूर तालुक्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून तेरा ते चौदा हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केली जात आहे. सलगच्या दुष्काळी परिस्थितीत हे पीक टिकवण्यासाठी डाळिंब उत्पादक शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. या शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राज्य शासनाने सन २०१६ पासून हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सुरू केली आहे. कमी, जास्त, खंडित पाऊस, सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून डाळिंब, चिकू, पेरू या फळपिकांना विमा संरक्षण व आर्थिक साहाय्य देणे हा या विमा योजनेचा मुख्य उद्देश आहे. कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येतो. दि. १५ जुलै ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत किमान ५ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत नुकसानभरपाई मिळू शकते. या योजनेची मुदत ३१जुलैपर्यंतच आहे. इंदापूर तालुक्यातील इंदापूर, बावडा, भिगवण, सणसर, निमगाव केतकी, लोणीदेवकर, काटी,अंथुर्णे या आठ महसूल मंडळात ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेची रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांना लागवडीपासूनच अडचणींचा सामना करावा लागत आाहे. जूनमध्ये लागवड झाली की, विमा उतरवला जाणे गरजेचे आहे. त्याकरिता महसूल विभागाची पीक पाण्याची नोंद लागते. महसूल विभाग आॅगस्टनंतर पीक पाण्याची नोंद लावते. त्यामुळे विमा योजनेचे बरेचसे प्रस्ताव आधीच माना टाकतात. यातून ही कोणी प्रस्ताव सादर केला, तरी बँका कर्जदार शेतकऱ्यांना प्राधान्य देतात. कारण की, कर्ज पुरवठ्यााच्या रकमेतून विम्याची रक्कम भरणे त्यांना सोपे जाते. बिगर कर्जदारांची हमी घ्यायला बँका तयार होत नाहीत, याचा फटका नेमका यंदा शेतकऱ्यांना बसला आहे. विमा योजनेसाठी समाधानकारक प्रस्तावच सादर झालेले नाहीत. डाळिंबावर पडलेल्या तेल्याने शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे ८० टक्के क्षेत्रावर तेल्याचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. तथापि, ती मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. (वार्ताहर)>नुकसानाची भीती : बागांना धोका प्रधानमंत्री पीक विमा योजनेत इंदापूर तालुक्यातील केवळ बाजरी, सोयाबीन व तूर या पिकांचा समावेश आहे. बाजरी (१ हजार ३६७ हेक्टर), तूर (४६२ हेक्टर), सोयाबीन (१७९ हेक्टर ) एवढेच या पिकाखालील क्षेत्र आहे. जी पिके मोठ्याप्रमाणावर घेतली जातात, त्याचे नुकसानही मोठे होऊ शकते. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी योजना आणू नयेत. इंदापूर तालुक्यात ऊस, केळी, डाळिंब, पपई, द्राक्षे ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्या पिकांसह आता धोक्यात असणाऱ्या डाळिंब पिकाचा विमा योजनेत समावेश करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महारुद्र पाटील यांनी केली आहे.उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी मंडल कृषी अधिकाऱ्यांनी १५ ते २० पथके तयार केली आहेत. कालपासून ही पथके बँका, शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. योजनेत सहभाग वाढावा, यासाठी प्रयत्न करीत आहेत.