शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून ३३६ कोटी वसुलीस शेतकरी संघटनांचा कडाडून विरोध

By राजाराम लोंढे | Updated: October 3, 2025 16:04 IST

टनाला विविध २८ रुपयांच्या कपाती

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य सरकारने आगामी ऊस गळीत हंगामात गाळपावर प्रतिटन पंधरा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कपातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खिशातून काढून घेऊन त्यांनाच दिले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसह इतर कपातीच्या माध्यमातून सरकार तब्बल ३३६ कोटी रुपये शेतकऱ्यांकडून वसूल करणार आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून कर घेऊन सरकार आपले दातृत्व दाखवत असून, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह इतर राज्यांत अशी वसुली नसताना केवळ महाराष्ट्रातच का?, असा सवालही केला जात आहे.सध्या महाराष्ट्रातील सगळीकडेच शेतकरी संकटात आहे. रासायनिक खतांचे दर, बी-बियाणे, कीटकनाशके, मजुरीचे दर वाढल्याने ताळमेळ घालताना त्याची दमछाक होत असताना, राज्य सरकार मात्र जिझिया कराच्या माध्यमातून त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे.सुरुवातीला मुख्यमंत्री सहायता निधी म्हणून उसाच्या टनाला एक रुपया कपात केला जायचा. त्यानंतर पाच रुपये केला, आता थेट पंधरा रुपये केले. पंधरामधील दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला, तर पाच रुपये पूरग्रस्तांसाठी घेतले जाणार आहेत. म्हणजे, शेतकऱ्यांकडूनच वसूल करून राज्य सरकार आपले दातृत्व दाखवत आहे.मग मराठवाड्यात कपाती कोठून करणार?सोलापूरसह मराठवाड्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऊस पिके वाहून गेल्याने तेथील साखर कारखान्यांच्या गाळप हंगामासमोर प्रश्न आहे. मग, तेथून कपाती कशा करणार? हे महत्त्वाचे आहे.अशा होत आहेत कपाती - प्रतिटन (संभाव्य १२.५० लाख टन गाळपानुसार होणारे पैसे)निधी - कपात प्रतिटन - होणारे पैसे (कोटीत) मुख्यमंत्री सहायता निधी - १० रुपये - १२५ कोटी पूरग्रस्तांच्या मदत - ५ रुपये - ६५ कोटी गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी मजूर महामंडळ - १० रुपये - १२५ कोटी साखर आयुक्त कार्यालय देखभाल दुरुस्ती - १ रुपया - १२.५० कोटी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट - १ रुपया - १२.५० कोटी साखर संघ - ५० पैसे - ६.२५ कोटी 

इतर कोणत्याही राज्यांत अशा प्रकारचा कर वसूल केला जात नाही. शेतकऱ्यांच्या खिशातून काढून त्यालाच पैसे देण्याचे दातृत्व सरकार दाखवत आहे. हे कदापि खपवून घेणार नाही, एक रुपयाही शेतकरी देणार नाही. गावोगावी या निर्णयाची होळी करून सरकारचा निषेध करणार आहे. - राजू शेट्टी (नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers protest ₹336 crore recovery; call it exploitative taxation.

Web Summary : Maharashtra government's decision to deduct ₹15 per ton of sugarcane for various funds, totaling ₹336 crore, has sparked outrage. Farmers are burdened with rising costs, and this levy is seen as adding salt to their wounds, unlike other states.