शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाचा प्रयत्न - पाटील
By Admin | Updated: July 18, 2015 00:11 IST2015-07-18T00:11:11+5:302015-07-18T00:11:11+5:30
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी न देऊन अडचणीत आणायचे व त्यांना जमीन संपादन कायद्याखाली आपली जमीन सोडायला भाग पाडायचे हाच सरकारचा हेतू

शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाचा प्रयत्न - पाटील
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी न देऊन अडचणीत आणायचे व त्यांना जमीन संपादन कायद्याखाली आपली जमीन सोडायला भाग पाडायचे हाच सरकारचा हेतू असल्याचा आरोप शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. पाटील यांच्या या आरोपाला सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला.
पाटील म्हणाले की, शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आल्यावर आपली जमीन विकायला तयार होतो. केंद्र सरकारला उद्योग, सरकारी प्रकल्प याकरिता जमीन हवी असून, त्यास ठिकठिकाणी विरोध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती न देण्यामागे शेतकऱ्याला
अडचणीत आणून त्याची जमीन भूसंपादन कायद्यानुसार काढून घेणे हाच हेतू आहे. सहकारमंत्री चंद्रकांत
पाटील यांनी कपिल पाटील यांचा हा दावा म्हणजे बादरायण संबंध जोडण्याचा प्रकार असल्याचे मत व्यक्त केले. उद्योग किंवा सरकारी प्रकल्पांकरिता शेतीखालील सुपीक जमीन घेतली जात नाही. हे वास्तव नजरेआड करून हे आरोप केल्याचे ते म्हणाले.