पत्नीचा खून करून शेतकरी पतीची आत्महत्या
By Admin | Updated: January 25, 2015 01:25 IST2015-01-25T01:25:04+5:302015-01-25T01:25:04+5:30
पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा मारुन खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना लातूर तालुक्यातील पिंप्रीआंबा येथे घडली.

पत्नीचा खून करून शेतकरी पतीची आत्महत्या
लातूर : सावकाराकडे गहाण पडलेली जमीन सोडवून आणा, कर्र्ज फेडा असा तगादा लावणाऱ्या पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा मारुन खून केल्यानंतर पतीने आत्महत्या केल्याची घटना लातूर तालुक्यातील पिंप्रीआंबा येथे घडली. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमाराला घडलेल्या या घटनेचा शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.
पिंप्री आंबा येथे अनंत भिसे (३५) यांची जमीन एका व्यक्तीकडे गहाण आहे.ही जमीन सोडवण्यावरून यारुन या दाम्पत्यात वारंवार खटके उडत.
शुक्रवारी दुपारी हे दाम्पत्य शेतात गेले असता याच कारणावरुन त्यांच्यात भांडण झाले. राग अनावर झालेल्या अनंतने अनिताच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला़ यात तिचा जागीच मृत्यू झाला़ (प्रतिनिधी)