शेतकरी आत्महत्यांवर उपाय सापडेना - खडसे

By Admin | Updated: December 28, 2014 02:20 IST2014-12-28T02:20:06+5:302014-12-28T02:20:06+5:30

१०० टक्के आत्महत्या थांबतील यासाठी सध्यातरी कोणता मार्ग दिसत नाही, अशी अगतिकता कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी अकोला येथे व्यक्त केली.

Farmers find solutions to suicides - Khadse | शेतकरी आत्महत्यांवर उपाय सापडेना - खडसे

शेतकरी आत्महत्यांवर उपाय सापडेना - खडसे

कृषिमंत्र्यांची अगतिकता : नैराश्य घालविण्यासाठी शेतीला जोडधंदा हवाच

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नेमका उपाय सापडत नसून, १०० टक्के आत्महत्या थांबतील यासाठी सध्यातरी कोणता मार्ग दिसत नाही, अशी अगतिकता कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी अकोला येथे व्यक्त केली. शेतकऱ्यांचे नैराश्य घालविण्यासाठी शेतीपूरक जोडधंद्याशिवाय तरणोपाय नाही, असेही ते म्हणाले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री खडसे बोलत होते. दुष्काळामुळे नापिकी आल्याने राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्येचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहे.
शेतीसाठी उपाययोजना
शेतकऱ्यांना ४० शेळ्या व २ बोकड देणार असून अनुसूचित जाती, जमातींच्या शेतकऱ्यांना निशुल्क गायींचे वाटप केले जाईल. सूक्ष्म, संरक्षित सिंचनास शेततळ्यांची योजना नव्याने राबविण्यात येईल. याकरिता २० लाखांचे अनुदान शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. शेततळ्यातून पाणी घेण्यासाठी सौरऊर्जेवरील पंपदेखील देण्यात येतील. यासाठी ४.१० लाखांचे अनुदान दिले जाईल. सूक्ष्म सिंचन योजनेचे साहित्य घेण्यासाठी अनुदान वाढवून दिले जाणार असून, आठ दिवसांत हे अनुदान त्यांना मिळेल. जिथे शेत तिथे रस्ता तयार करण्याचे आदेश दिले आहेत. माती परीक्षणाचा अहवाल कृषी कार्ड शेतकऱ्यांना घरपोच दिले जाणार असल्याचे खडसे यांनी सांगितले.

कृषी कर्जमाफीवर
राजन यांचे प्रश्नचिन्ह
च्उदयपूर : सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनांवर प्रश्नचिन्ह उभे करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी अशा प्रकारच्या योजनांनी शेतकऱ्यांना मिळणारा कर्जपुरवठा प्रभावित केल्याचे म्हटले आहे. भारतीय आर्थिक संघाच्या वार्षिक संमेलनात बोलताना राजन म्हणाले की, काही राज्यांमध्ये अनेक प्रसंगी कर्जमाफी दिली गेली.
च्या माफी योजना कितपत यशस्वी झाल्या? यासंदर्भात जे अध्ययन आले त्यात या योजना निकामी ठरल्याचेच आपल्याला दिसते. खरेतर या योजनांमुळेच शेतकऱ्यांना दिला जाणारा कर्जपुरवठा खंडित झाला आहे.
च् शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना राजन यांनी हा अत्यंत महत्त्वपूर्ण व संवेदनशील मुद्दा असून, त्याची सखोल तपासणी केली जाण्याची गरज व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हे शेती क्षेत्रापुढे मोठे आव्हान असून, शेतकऱ्यांतील नैराश्य घालविण्यासाठी व्यापकतेने काम करावे लागणार आहे. शेतकऱ्यांनी शेतीपूरक जोडधंदा, प्रक्रिया उद्योग, दुग्धोपादनासारखे व्यवसाय अधिक वृद्धिंगत करण्यावर शासनाचा
भर आहे. - एकनाथ खडसे, कृषिमंत्री

 

Web Title: Farmers find solutions to suicides - Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.