सावकारीविरोधात शेतकऱ्याचे उपोषण
By Admin | Updated: July 2, 2015 00:34 IST2015-07-02T00:34:36+5:302015-07-02T00:34:36+5:30
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात सावकारीत गेलेली जमीन सोडवण्यासाठी येथील कुगांवमधील शेतकरी किसन बापू हवालदार यांनी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे

सावकारीविरोधात शेतकऱ्याचे उपोषण
मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात सावकारीत गेलेली जमीन सोडवण्यासाठी येथील कुगांवमधील शेतकरी किसन बापू हवालदार यांनी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. साहाय्यक निबंधकांकडे तक्रार केल्यानंतरही जमीन परत मिळत नसल्याने धरणे आंदोलन करीत असल्याचे हवालदार यांचे म्हणणे आहे.
करमाळा तालुक्यात ६० पैकी ४० शेतकऱ्यांच्या जमिनी व्याजात बुडालेल्या आहेत. त्यामुळे सावकारांनी त्या जमिनी परस्पर विकल्याचे समजते. शेतकऱ्यांनी साहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.