शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो...१५ जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका! महाराष्ट्र चिंतेत, पाणीसाठा घटतोय वेगाने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 10:52 IST

पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यात वेगाने घट होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे.

विशाल सोनटक्के  यवतमाळ :पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांसह सर्वांचीच चिंता वाढली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यात वेगाने घट होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे.  ऐन पावसाळ्यात राज्यातील ५९१ गावे आणि १३१२ वाड्यांची ५०१ टँकरद्वारे तहान भागविण्यात येत आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार खरिपासाठी यंदा राज्यात १४६.८५ लाख हेक्टरवर खरीप पेरणी अपेक्षित आहे. पाऊस आणखी लांबणीवर पडल्यास हे नियोजन बिघडेल. त्यामुळे १५ जुलैपर्यंत पेरणीची घाई करू नका, असे आवाहन तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना केले आहे.

तारीख - १४ जूनपर्यंत.- अपेक्षित पाऊस - सरासरी ९६.०९ मिमी- झाला किती - सरासरी ३४.०९ मिमी- म्हणजेच - अपेक्षित सरासरीच्या ३६ टक्के- गेल्या वर्षी १४ जूनपर्यंत - १२४ टक्के

कोणत्या विभागात किती पाऊस? (१४ जूनपर्यंत)कोकण - २४.०३ टक्केनाशिक - ५०.०५ टक्केपुणे - ३७.०८ टक्केऔरंगाबाद - ६९.०४ टक्केअमरावती - ३२.०४ टक्केनागपूर - ११.०९ टक्के

पाणीटंचाईच्या झळा५९१ गावे ।  १३१२ वाड्या५०१ टँकर  । गेल्या वर्षी - ४८७ टँकर 

पाणीटंचाईचा प्रश्न गंभीरएकूण प्रकल्प- ३,२६७उपलब्ध साठा - २३.१६%(१४ जून रोजी)

खरीप हंगामाची प्रशासन स्तरावर तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, पाऊस लांबणीवर पडला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २२ तारखेनंतरच पावसाचा अंदाज असल्याने २२ जूनपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्या करूच नये. जुलै महिन्यात ६ तारखेनंतर पुन्हा पाऊस ओढ देण्याची शक्यता आहे. सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत पेरण्या केल्या जाऊ शकतात. - शंकर तोटावार, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती

विभाग - टँकर- नाशिक - ११९- कोकण - ११५- पुणे - ७९- औरंगाबाद - ९४- अमरावती - ८७- नागपूर - ७

सर्वात कमी विदर्भात राज्यात सर्वात कमी पाऊस विदर्भात झाला आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत १४ जूनपर्यंत सरासरीच्या केवळ ३२.०४ टक्के तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत सरासरीच्या ११.०९ टक्के पाऊस झाला आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस