शेतकऱ्यांचे ५ कोटी बँक खात्यावर जमा

By Admin | Updated: October 22, 2015 01:20 IST2015-10-22T01:20:37+5:302015-10-22T01:20:37+5:30

जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग आली असून, शिर्डी विमानतळासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव पाच कोटी रुपयांचा मोबदला

Farmers deposited on 5 crore bank accounts | शेतकऱ्यांचे ५ कोटी बँक खात्यावर जमा

शेतकऱ्यांचे ५ कोटी बँक खात्यावर जमा

अहमदनगर : जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला खडबडून जाग आली असून, शिर्डी विमानतळासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव पाच कोटी रुपयांचा मोबदला उपविभागीय कार्यालयाच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बँक खात्यावर बुधवारी जमा केला.
कोपरगाव न्यायालयामार्फत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्यायालयीन लढाईला अखेर यश आले़ कोपरगाव न्यायालयाच्या आदेशाने सोमवारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची खुर्ची जप्त करण्यात आली़ न्यायाधीश व्ही़ एल़ पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली़ सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारीही संगणक जप्तीची कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीसह संगणक जप्तीच्या कारवाईने प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली़ न्यायालयाच्या दणक्याने मंत्रालयातील यंत्रणाही हलली़ काकडी येथील ४९ शेतकऱ्यांना वाढीव दराने ७ कोटी ४९ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव गेल्या काही दिवसांपासून धूळ खात पडून होता़ त्यावरील धूळ झटकली़ मंत्रालयातून चक्रेफिरली आणि काकडी
येथील शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळाला़
शेतकऱ्यांच्या ७ कोटी ४९ लाखांपैकी ५ कोटी रुपये शिर्डी उपविभागीय कार्यालयाच्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास सायंकाळी प्राप्त झाले़ उपविभागीय कार्यालयाकडून ही रक्कम कोपरगाव न्यायालयात जमा केली जाणार आहे़ न्यायालयाकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Farmers deposited on 5 crore bank accounts