शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

...जेव्हा शेतकरी आमदाराच्या गळ्यात पडून ढसाढसा रडतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 12:20 IST

विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : दोन दिवसांपूर्वी परतीच्या पावसाने तालुक्यातील पिके वाया गेली, शेतात गुडघाभर पाणी साचले, घरे पडली. शेतकरी हतबल झाले असून मदतीसाठी कोणी तरी येईल, अशी चातकासारखी वाट बघत गावोगावच्या शेतकऱ्यांचे डोळे रस्त्याकडे लागले असतानाच गेवराई सेमी येथे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अब्दुल सत्तार, चंद्रकांत खैरे यांच्या गाड्यांचा ताफा रात्री ८ वाजेच्या सुमारास तेथे पोहोचला. तेव्हा तेथील शेतकरी बापू घुगे, सिल्लोड मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे सतार यांचे पालकमंत्री व आमदार सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसाढसा रडले.

राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. त्यामुळे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी राज्यभर दौरे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यातील विविध गावात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचे प्रयत्न करत आहे. रविवारी सिल्लोडच्या गेवराई सेमी येथे एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली.

मात्र मंत्र्यांचा ताफा येताच गेवराई सेमी येथील शेतकरी बापू घुगे, मुरलीधर कापडे, हरिदास ताठे हे आमदार अब्दुल सत्तार यांच्या गळ्यात पडून ढसा ढसा रडले. साहेब आम्ही बरबाद झालो...पिके वाया गेली... घरे पडली... अतिवृष्टीने होते नव्हते ते सारे हिरावून घेतले. आता तुम्हीच आमचे मायबाप... काहीही करा: पण आम्हाला या संकटातुन सावरा अशी विनवणी शेतकरी करीत होते. ही विदारक परिस्थिती बघून मंत्र्यांचेही डोळे पाणावले नसतील, तर नवल.

यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. धीर धरा, घाबरू नका. आत्महत्येसारखा विचारही मनात आणू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. नुकसानभरपाईसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गरज पडली तर सरकारला पैशाची तरतूद करण्यास भाग पाडू. नुकसानभरपाईचे फोटो तुम्ही शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करा. प्रत्येकाला नुकसानभरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाFarmerशेतकरीdroughtदुष्काळ