शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

वसंतदादा कारखान्यावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

By admin | Updated: July 26, 2016 00:55 IST

वसंतदादा कारखान्याची २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील उसाची बिले थकीत असल्याने व दिलेले धनादेश न वठल्याने सोमवारी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्यावर हल्लाबोल केला

सांगली : वसंतदादा कारखान्याची २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील उसाची बिले थकीत असल्याने व दिलेले धनादेश न वठल्याने सोमवारी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्यावर हल्लाबोल केला. खिडक्यांच्या काचा फोडून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. कारखान्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दिवसभर ठिय्या मारला. पुढील सोमवारच्या तारखेचा धनादेश कारखाना प्रशासनाने दिल्याने आंदोलन शांत झाले. वसंतदादा कारखान्याच्या थकीत ऊसबिलाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. कार्यक्षेत्रातील शेतकरी आक्रमक होऊ लागल्यानंतर कारखाना प्रशासनाने त्यांना धनादेश दिले होते. परंतु ते न वठल्याने संतप्त झालेल्या शेतकरी कारखान्यावर एकत्र आले. कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काहींनी खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्याचवेळी पोलिस दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कारखाना प्रशासनाचा धिक्कार करीत जोरदार निदर्शने करण्यात आली. बिले मिळाल्याशिवाय कारखान्यावरून जाणार नाही, अशी भूमिका सर्व शेतकऱ्यांनी घेतली. शेकडो शेतकऱ्यांनी कार्यालयाला गराडा घातल्याने प्रशासनाची कोंडी झाली. थकीत बिलाच्या प्रश्नावर कारखान्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी काही शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. पाटील यांनी पुढील आठवड्याचा धनादेश देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार कारखान्याचे मुख्य लेखापाल व्ही. एस. सरनोबत यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. १ आॅगस्टचे धनादेश लिहून दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. (प्रतिनिधी)शेतकरी संतप्तकारखाना कार्यस्थळावर सुमारे सव्वाशे शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या मांडला होता. शेतकरी संतप्त झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आला होता. थकबाकीबाबत गोंधळ कारखान्याची २0१३-१४, २0१४-१५ या हंगामातील नेमकी किती थकबाकी आहे, याबाबत संभ्रमावस्था आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनुसार, सुमारे १३ कोटींची थकबाकी आहे, तर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, २५ कोटी आहे.