नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: August 11, 2015 01:13 IST2015-08-11T01:13:09+5:302015-08-11T01:13:09+5:30
मी मुख्यमंत्र्यांचा ‘फॅन’ असून एकदा तरी त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशी अंतिम इच्छा व्यक्त करून, सततच्या नापिकीला कंटाळलेल्या एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या
नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
बोरगाव मंजू (जि. अकोला) : मी मुख्यमंत्र्यांचा ‘फॅन’ असून एकदा तरी त्यांनी माझ्या कुटुंबाला भेट द्यावी, अशी अंतिम इच्छा व्यक्त करून, सततच्या नापिकीला कंटाळलेल्या एका युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील कौलखेड गोमासे येथे शनिवारी रात्री घडली.
मंगेश गणेश उमाळे (२७) असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. शनिवारी रात्री या सुशिक्षित युवा शेतकऱ्याने अंबिकापूर शेतशिवारातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. रविवारी सकाळी ग्रामस्थांना झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांना मंगेशजवळ त्याने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली.
सततच्या नापिकीमुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे मंगेशने चिठ्ठीत नमूद केले आहे. त्याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. (वार्ताहर)
मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाची भेट घ्यावी!
मी सुरुवातीपासून मुख्यमंत्र्यांचा ‘फॅन’ आहे, त्यांनी आपल्या कुटुंबीयांची एकदा अवश्य भेट घ्यावी, अशी शेवटची इच्छा मंगेशने चिठ्ठीतून व्यक्त केली आहे.