- रुपेश उत्तरवारयवतमाळ : गत १९ वर्षांतील शेतकरी आत्महत्यांचा आकडा १६ हजारांवर पोहोचला आहे. यावर्षीच्या ओल्या आणि कोरड्या दुष्काळाने ही स्थिती गंभीर होण्याची भीती आहे.पाच संवेदनशील जिल्ह्यातला शेतकरी आत्महत्येचा आकडा १६ हजार ४६८ वर पोहचला आहे. दुष्काळी वर्षाने गतवर्षी ११०७ आत्महत्यांची नोंद सहा जिल्ह्यांत करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. गतवर्षी २५५, सात महिन्यांत १३७ तर १९ वर्षांत ४,३७३ आत्महत्या झाल्या आहेत.
धक्कादायक : शेतकरी आत्महत्यांनी केला १६ हजारांचा आकडा पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 05:59 IST