शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगू...अतिवृष्टीने पिकांसह मुलालाही हिरावले! तोंडात वीजेची तार पकडून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 09:02 IST

सहा व्यक्तीचे आमचे संयुक्त कुटुंब... गणेश कर्ता होता... साठी पार केल्याने आम्ही बुडा-बुडी थकलेलो... शेती करून गणेश पत्नी, दोन लेकरांसह आमचेही पालन-पोषण करायचा...

विनोद घोडेचिकणी (जामणी)/वर्धा :

सहा व्यक्तीचे आमचे संयुक्त कुटुंब... गणेश कर्ता होता... साठी पार केल्याने आम्ही बुडा-बुडी थकलेलो... शेती करून गणेश पत्नी, दोन लेकरांसह आमचेही पालन-पोषण करायचा... पण अतिवृष्टीमुळे पीक खरडून गेले... शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत असलेल्या लेकराने टोकाचे पाऊल उचलले... काय सांगू आता... अतिवृष्टीने पिकांसह माझ्या मुलालाही हिरावले, अशी व्यथा अश्रू अनावर झालेले गणेशचे वडील श्रावण माडेकर यांनी ‘लोकमत’कडे मांडली. तोंडात जिवंत वीज तार पकडून गणेशने जीवन संपविले.

धक्कादायक! विजेची तार तोंडात धरून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या, मदतीच्या प्रतीक्षेत गेला आणखी एक जीव

जून महिन्यात शेतात लागवड केली. वेळीच पीक अंकुरल्याने यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा होती; पण अतिवृष्टीमुळे भदाडी नदीला पूर आला. याच पुरात संपूर्ण पीक खरडून गेले. त्यामुळे काही दिवसांपासून गणेश हा विवंचनेत होता. विविध राजकीय पक्षांच्या बड्या लोकप्रतिनिधींसह काही अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्याने वेळीच शासकीय मदत मिळेल अशी आशा गणेशला होती, तसा तो नेहमी बोलायचाही. त्या तणावातच त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबाचा आधारस्तंभ गेल्याने  दु:खाचा डोंगर कोसळल्याचे माडेकर कुटुंबीयांनी सांगितले.

मुलगी पहिलीत, तर मुलगा तिसरीतगणेश माडेकर याला दोन अपत्ये आहेत. आठ वर्षांचा मुलगा तेजस तिसरीचे, तर सहा वर्षांची मुलगी प्राजक्ता पढेगावातीलच शाळेत पहिलीचे शिक्षण घेत आहे. घटनेनंतर गणेशच्या पत्नीची प्रकृती बिघडल्याने तिला देवळी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या