शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

"बाप राबतो म्हणून अन्न मिळतं; काही वाचाळवीर त्याचीच चेष्टा करताहेत"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 07:52 IST

शेतकरी नेते अजित नवले यांचं पंतप्रधान मोदींवर जोरदार शरसंधान

नाशिक: फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅपवरील वाचाळवीर कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असल्याचं सांगत आहेत. पण मग त्यांना दिल्लीत सुरू असलेले आंदोलन दिसत नाही का, असा सवाल शेतकरी नेते अजित नवले यांनी उपस्थित केला. वर खोटारडा माणूस बसला आहे, हे आपलं दुर्दैव. त्यांनी दिलेलं 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरलं, अशा शब्दांत नवलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लक्ष्य केलं. ते काल शिरपूरमध्ये झालेल्या किसान सभेच्या मोर्चात बोलत होते.नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत नवलेंनी सोशल मीडियावर कायद्यांची भलामण करणाऱ्या आणि शेतकऱ्यांवर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं. 'बाप राबतो म्हणून अन्न मिळतं हे लक्षात ठेवा. तुम्ही त्याच बापाची चेष्टा करत आहात. ज्यांना बटाटा कुठे येतो माहिती नाही, ते आम्हाला शेतीचं अर्थकारण सांगत आहेत,' असा खोचक टोला नवले यांनी लगावला.नवले यांनी कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवरचा जोरदार समाचार घेतला. आमचा माल कुठे विकायचा हे आम्ही पाहू. तुम्ही हे सांगणारे कोण? कृषी कायद्यानुसार एखादा करार झाल्यानंतर व्यापाऱ्याने पैसे बुडवले तर शेतकऱ्याला कोर्टात जाण्याचा अधिकार नाही. ज्याचं डोकं स्वत:च्या खांद्यावर आहे, त्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे, असं नवले म्हणाले.पंतप्रधान मोदींवरही निशाणावर खोटारडा माणूस बसला आहे हे आपलं दुर्दैव. त्यांनी दिलेलं 15 लाखांचं आश्वासनही खोटं ठरलं. आपण शेतात काय लावलं पाहिजे ते मूठभर लोक सांगणार. कडाक्याच्या थंडीत शेतकरी दिल्लीत बसला आहे. दिल्लीतीत शेतकऱ्यांचं बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही, असं अजित नवले यांनी म्हटलं.'मोदींच्या कार्यकाळात फक्त पाच टक्के लोकांचा विकास'देशातील बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी आहेत. या देशात फक्त पाच टक्के लोकांचा विकास होत आहे. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत. सर्वठिकाणी कंत्राटी पद्धत आली आहे. शेतकरी संकटात आला तर संपूर्ण समाज संकटात येईल, असा इशारा किसान सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी दिला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी