शेतकरी-शेतमजूर ‘आप’ची संवादयात्रा
By Admin | Updated: May 15, 2015 01:27 IST2015-05-15T01:27:18+5:302015-05-15T01:27:18+5:30
विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी-शेतमजुरांच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे (आप) संवादयात्रा

शेतकरी-शेतमजूर ‘आप’ची संवादयात्रा
पुणे : विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी-शेतमजुरांच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी आम आदमी पार्टीतर्फे (आप) संवादयात्रा काढली जाणार आहे. रविवारपासून सुरू होणाऱ्या राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा व संवाद यात्रेचा समारोप २४ मे रोजी जिजाऊ सृष्टी सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे होणार आहे.
आपचे शहरी भागातील कार्यकर्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आत्महत्या थांबविण्यासाठी आवश्यक उपायोजना व कृती कार्यक्रमाची चर्चा यात करण्यात येईल. संवादातून शेतकऱ्यांना आत्मविश्वास व बळ देण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. आपचे विविध शहरांतील कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतील.