मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण
By Admin | Updated: March 23, 2017 22:32 IST2017-03-23T22:32:32+5:302017-03-23T22:32:32+5:30
आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना मंत्रालयात घडली

मंत्रालयात शेतकऱ्याला मारहाण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलेला असतानाच आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यास पोलिसांकडून मारहाण झाल्याची घटना मंत्रालयात घडली. या घटनेमुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी याचा इन्कार केला असून उलट शेतकऱ्यानेच पोलिसाला चावा घेतल्याचे म्हटले आहे.
रामेश्वर भुसारी असे शेतकऱ्याचे नाव असून ते मुळचे औरंगाबाद येथील रहिवासी आहेत. गारपीटीमुळे त्यांच्या पॉलीहाउसचे नुकसान झाले होते. त्याच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी त्यांनी गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मंत्रालय गाठले. मंत्रालय बंद होण्याच्या वेळेत भुसारी तेथे आल्याने तेथील सुरक्षा रक्षकाने त्यांना अटकाव केला. मात्र तरी देखील त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना मारहाण केली. ज्यात ते जखमी झाले.