शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कुंपणानेच शेत खाल्लं! सामाजिक न्यायमंत्री बडोलेंनी मुलीलाच दिला शिष्यवृत्तीचा लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 20:36 IST

मुंबई, दि. ६ - पारदर्शक कारभाराचा गाजावाजा करणाऱ्या फडणवीस सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या गैरकारभार समोर आला आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अनुसूचित जातीच्या आर्थिकदृष्टा मागास विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ आपल्याच मुलीला दिल्याचे उघड झाले आहे.  बडोले यांची कन्या श्रुती बडोले हिला या शिष्यवृत्तीसाठी पात्र ...

मुंबई, दि. ६ - पारदर्शक कारभाराचा गाजावाजा करणाऱ्या फडणवीस सरकारमधील अजून एका मंत्र्याच्या गैरकारभार समोर आला आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी अनुसूचित जातीच्या आर्थिकदृष्टा मागास विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा लाभ आपल्याच मुलीला दिल्याचे उघड झाले आहे.  बडोले यांची कन्या श्रुती बडोले हिला या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. गोरगरीबांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीवर मंत्र्यांनीच डल्ला मारल्याने संताप व्यक्त होत आहे. परदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मागास वर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी राज्य शासनाकडून सोमवारी यादी पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीमध्ये एकूण ३५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री असलेल्या राजकुमार बडोले यांच्या कन्येचेही या लाभार्थी विद्यार्थ्यांमध्ये नाव आहे. श्रृती बडोले हिला इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.  केवळ बडोलेंची कन्याच नव्हे तर समाज कल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अधिकारी दयानंद मेश्राम यांच्या मुलांचाही या यादीत समावेश आहे. याआधीच प्रकाश मेहता यांनी केलेल्या गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या फडणवीस सरकारला राजकुमार बडोले यांनी आपल्या मुलीला शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून दिल्याने अधिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

प्रकाश मेहतांच्या अडचणी वाढल्या

 मुंबईतील एम.पी मिल कंपाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील घोटाळ्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतायांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी लोकायुक्तांना मेहता यांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मेहता यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत.प्रकाश मेहता यांच्या एसआरए घोटाळ्याचं प्रकरण विधानसभेत चांगलंच गाजलं होतं. प्रकाश मेहता यांच्यावरील आरोपांवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. विरोधकांनी सभागृहात गदारोळ करत प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहतांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रकाश मेहता आमदार असल्याने लोकायुक्तांकडून चौकशी होण्याअगोदर राज्यपालांची संमती आवश्यक होती. मुख्यमंत्र्यांनी संमती देण्यासाठी राज्यपालांना विनंती केल्यानंतर राज्यपालांनी आज लोकायुक्तांना मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले.

 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार