नोटाबंदीचे दूरगामी वाईट परिणाम- पवार
By Admin | Updated: December 31, 2016 00:52 IST2016-12-31T00:52:23+5:302016-12-31T00:52:23+5:30
नोटाबंदी झाली खरी; परंतु चलन तुटवड्याचा परिणाम व्यवसाय, उद्योग, रोजगार, शेतकरी यांच्यासह समाजातील सर्व घटकांवर झाला आहे. यामुळे अर्थव्यवस्था

नोटाबंदीचे दूरगामी वाईट परिणाम- पवार
मोडनिंब (सोलापूर) : नोटाबंदी झाली खरी; परंतु चलन तुटवड्याचा परिणाम व्यवसाय, उद्योग, रोजगार, शेतकरी यांच्यासह समाजातील सर्व घटकांवर झाला आहे. यामुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून, याचे दूरगामी परिणाम होणार असल्याचे मत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
माढा तालुक्यातील वरवडे येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात उभारलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण व नूतन इमारतीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले़ अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील होते. नोटाबंदी होऊन पन्नास दिवस झाले तरी बँकांसमोरील रांगा कमी होईनात. या रांगांमध्ये एकही धनवान दिसला नाही, सर्व गोरगरीब व सर्वसामान्य जनता दिसत आहे. मात्र, याबाबत सरकारला कोणतीही खंत नसल्याची टीका पवार यांनी केली़ (प्रतिनिधी)