चाहत्यांची दिवाळी
By Admin | Updated: May 9, 2015 01:48 IST2015-05-09T01:48:15+5:302015-05-09T01:48:15+5:30
बॉलीवूड दबंगस्टार सलमान खानला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

चाहत्यांची दिवाळी
बॉलीवूड दबंगस्टार सलमान खानला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सलमानच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. ‘आम्ही तुझ्याबरोबर आहोत’, ‘तू आमचा हीरो आहेस’ असे फलक घेऊन त्यांनी सलमानला शुभेच्छा दिल्या. सलमानच्या घराबाहेर गर्दी करणाऱ्या चाहत्यांमध्ये लहान मुलांपासून प्रौढांचाही समावेश होता. सेशन कोर्टाच्या शिक्षेच्या निर्णयामुळे काल सल्लूच्या फॅन्समध्ये दु:खाची छाया पसरली होती. मात्र उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. आपल्या लाडक्या सल्लूला शुभेच्छा देण्यासाठी शेकडो तरुणांनी त्याच्या राहत्या घराबाहेर गर्दी केली होती.