गोव्यातील प्रसिध्द व्यावसायिक अनिल साळगावकर यांचे निधन
By Admin | Updated: January 1, 2016 15:50 IST2016-01-01T15:50:40+5:302016-01-01T15:50:40+5:30
गोव्यातील प्रसिध्द उद्योगपती आणि माजी आमदार अनिल साळगावकर यांचे शुक्रवारी सकाळी सिंगापूर येथे निधन झाले.

गोव्यातील प्रसिध्द व्यावसायिक अनिल साळगावकर यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १ - गोव्यातील प्रसिध्द उद्योगपती आणि माजी आमदार अनिल साळगावकर यांचे शुक्रवारी सकाळी सिंगापूर येथे निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. खाणकामासह गोव्यामध्ये साळगावकर समूहाचे अनेक उद्योग आहेत. २६ डिसेंबर १९४० रोजी जन्मलेल्या साळगावकर यांचा मागच्याच आठवडयात सिंगापूरमध्ये ७५ वा जन्मदिन साजरा करण्यात आला होता.
सिंगापूरमध्ये असताना साळगावकर अचानक आजारी पडले. त्यानंतर त्यांना तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिल बाबा म्हणून ते गोव्यामध्ये लोकप्रिय होते. दिवगंत वासुदेव साळगावकर यांचे ते थोरले सुपूत्र होते. अनिल साळगावकर यांचा समाजातील सर्वच क्षेत्रात वावर होता.
२००७ मध्ये गोव्याच्या सानवोरडेम मतदारसंघातून ते निवडून विधानसभेवर गेले होते. अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला होता. त्यांची दोन मुले समीर आणि अर्जून राजकारणामध्ये सक्रीय आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी लक्ष्मी, दोन विवाहीत कन्या आणि दोन मुले असा परिवार आहे.