शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

कुटुंब रंगलंय ड्रग्जच्या विक्रीत...

By admin | Updated: May 29, 2017 03:38 IST

चैनीचे जीवन जगण्यासाठी आईसह दोन मुले आणि दोन सुनांनी घरातूनच ड्रग्जचा धंदा सुरू केल्याची धक्कादायक माहिती दिंडोशी पोलिसांनी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चैनीचे जीवन जगण्यासाठी आईसह दोन मुले आणि दोन सुनांनी घरातूनच ड्रग्जचा धंदा सुरू केल्याची धक्कादायक माहिती दिंडोशी पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आली आहे. या प्रकरणात आईसह मुलगा आणि दोन सुनांना दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आणखीन एक मुलगा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.गीता श्याम परमार (४७), रमेश श्याम परमार (२७), शालू रमेश परमार (१९) आणि मारता अजय परमार (२०) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर अजय परमार हा फरार आहे.गोरेगावातील बीएमसी कॉलनीत एकमजली घरात परमार कुटुंबीय राहतात. पती श्याम परमार याच्या निधनानंतर गीतावर मुलाची जबाबदारी आली. श्याम याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सुरुवातीला रमेश आणि अजय हे चोरी करून आणत असलेल्या पैशांवर त्यांचा घरखर्च भागे. त्यानंतर गीता हिने चैनीचे जीवन जगण्यासाठी घरातून ड्रग्जचा धंदा सुरू केला. यामध्ये मुलांच्या लग्नानंतर तिने सुनांची मदत घेतली. मुले बाहेर चोऱ्या करायचे तर सुना आईसह ड्रग्जचा पुरवठा करत असे. घराजवळच फिल्मसिटी असल्याने या ठिकाणी येणाऱ्या स्ट्रगलर, पडद्यामागील कलाकारांना त्यांनी हेरले. तसेच जवळीलच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जवळपास २ ते ३ हजार तरुण-तरुणी काम करतात. यातीलही काही जण तिचे ग्राहक बनले होते. त्यांनाही या ड्रग्जचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. हळूहळू ग्राहक वाढले. त्यामुळे परमार कुटुंबीयांचा धंदाही तेजीत सुरू झाला. गुप्तपणे सुरू असलेल्या या धंद्याबाबत स्थानिकांना संशय येत नसे. सासूसह दोन्ही सुना दिसायला साध्या असल्या तरी या कामात मात्र भलत्याच चलाख होत्या. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्यांच्या घरी छापा टाकला. मात्र पोलीस आल्याचे पाहून सासू-सुनांनी स्वत:च स्वत:चे कपडे फाडून घेतले होते आणि पोलिसांनी विनयभंग केल्याचा कांगावा केला होता. अशात आरडाओरडा करून शेजाऱ्यांना गोळा करायच्या आणि त्या गोंधळात ड्रग्ज घेऊन पळ काढायचा, हा त्यांचा ‘फॉर्म्युला’ होता. अशातच नुकतेच नियुक्त झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये या परमार कुटुंबीयांना धडा शिकविला. या वेळी अचानक आलेल्या पोलिसांमुळे सासू-सुना हडबडल्या. समोर महिला स्टाफ पाहून त्यांची तारांबळ उडाली. या वेळी त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये किमतीचे ६० गॅ्रम एमडी, ८ कोरेक्स बॉटल्स, ३५ फेनेरेक्स बॉटल्स, १३५ ग्रम चरस, ३९ गॅ्रम गांजा, ७९९ बटण असा एकूण १ लाख ५६ हजार हजार किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. गीतासह मुलगा रमेश, सून शालू आणि मारता यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. तसेच पसार अजयचा शोध सुरू आहे. दोन्हीही मुलांवर मारामारी, चोरीचे सहाहून अधिक गुन्हे दाखल आहेत. असे ठरायचे भाव...१ गॅ्रम एमडी आणि चरससाठी ते बाराशे ते दोन हजार रुपये घेत होते. तर एका बटणमागे त्यांना बाराशे रुपये मिळत होते. फिल्मसिटीमधील स्ट्रगलर, कॉर्पोरेट सेक्टरमधील तरुण, तरुणी त्यांचे ग्राहक होते. या पैशांतून त्यांनी घरात महागड्या वस्तू, दागिने खरेदी केले होते.  तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरीपोलीस निरीक्षक रवी अडाणे, एपीआय घनश्याम नायर, अविनाश जाधव, देसाई, पीएसआय पाटणे, पोलीस हवालदार मंदार जाधव महिला पोलीस शिपाई आनिता सुतार, सुवर्णा शिंदे या पथकाने ही कामगिरी केली आहे.