पत्नीची खोटी तक्रार हा छळाचाच प्रकार

By Admin | Updated: August 2, 2014 03:26 IST2014-08-02T03:26:27+5:302014-08-02T03:26:27+5:30

पत्नीने पती व सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची खोटी तक्रार करणे हा पती व त्याच्या कुटुंबियांना छळ करण्याचाच प्रकार असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे़

False complaint of wife is a type of harassment | पत्नीची खोटी तक्रार हा छळाचाच प्रकार

पत्नीची खोटी तक्रार हा छळाचाच प्रकार

अमर मोहिते, मुंबई
पत्नीने पती व सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची खोटी तक्रार करणे हा पती व त्याच्या कुटुंबियांना छळ करण्याचाच प्रकार असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे़
न्या़ अभय ओक व न्या़ ए़ एस़ चांदूरकर यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा देत पुण्यातील एका जोडप्याचा घटस्फोट मंजूर केला़ विशेष म्हणजे या घटस्फोटासाठी पतीने पुणे कुटुंब न्यायालयात अर्ज केला होता़ त्यात पत्नीने खोटी तक्रार केल्याने मला व माझ्या कुटुंबियांना अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करावा लागला़ याचा नाहक त्रास झाला असून या द्वारे पत्नीने छळ केला आहे़ त्यामुळे घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी पतीने केली होती़ मात्र पुणे न्यायालयाने पतीचा अर्ज फेटाळला़
अखेर पतीने यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली़ महत्त्वाचे म्हणजे २००१ मध्ये विवाह झाल्यानंतर काही दिवस पत्नीने संसार नीट केला़ पण काही दिवसानंतर ती न सांगताच माहेरी जाऊ लागली़ मुलगा झाला तेव्हीही ती माहेरीच होती़ त्यावेळी मुलगा झाल्याचेही तिने कळवले नाही़ अखेर एक दिवस पोलीस ठाण्यातून पत्नीने तक्रार केल्याचा फोन आला़ यात अटक होऊ नये म्हणून अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करावा लागला़ हा पत्नीने केलेला छळच असून घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी पतीने याचिकेत केली होती़मात्र सासरचे माझाच छळ करतात़ वांरवार हुंड्याची मागणी करतात़ तरीही मला घटस्फोट नको, असा दावा पत्नीने केला़
उभयंतांच्या युक्तिवादावर व त्यांनी दिलेल्या जबाबावर न्यायालयाने पत्नीने केलेली तक्रार ही छळाचाच प्रकार असल्याचा निष्कर्ष नोंदवला़ न्यायालय म्हणाले, पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवताना़
त्यात हिंसाचाराचे एकही उदाहरण दिले नाही़ तसेच पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानंतर पत्नीने यासाठी पुढे काहीही केले
नाही़ (प्रतिनिधी)

Web Title: False complaint of wife is a type of harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.