लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: February 27, 2016 18:42 IST2016-02-27T18:42:50+5:302016-02-27T18:42:50+5:30
गोरेगावमध्ये धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रवीण ध्रुव असं या तरुणाचे नाव आहे

लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 27 - गोरेगावमध्ये धावत्या लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रवीण ध्रुव असं या तरुणाचे नाव आहे. रेल्वेच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार अपघात झाला तेव्हा प्रवीण लोकलच्या दरवाजात उभा होता. गोरेगावमधून प्रवीणने फास्ट लोकल पकडली होती. सिग्नलच्या खांबाचा धक्का लागून तो लोकलमधून खाली पडला, अपघातानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला.