न्यायालयाचे बनावट वॉरंट; पोलिसाला अटक
By Admin | Updated: February 12, 2015 02:56 IST2015-02-12T02:56:30+5:302015-02-12T02:56:30+5:30
पुणे येथील रवींद्र पाटील यांच्या नावाने न्यायालयाचे बनावट वॉरंट काढून त्रास दिल्याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनला दाखल

न्यायालयाचे बनावट वॉरंट; पोलिसाला अटक
जळगाव : पुणे येथील रवींद्र पाटील यांच्या नावाने न्यायालयाचे बनावट वॉरंट काढून त्रास दिल्याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यात पुणे गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपी सोपान भिका पाटील (रा. गणेश कॉलनी) यांच्या घराच्या झडतीत महत्त्वपूर्ण कागदपत्र मिळाले आहेत. पुणे येथील रहिवासी रवींद्र पाटील यांच्या पत्नीचे जळगावला माहेर आहे. पाटील दाम्पत्यात काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरूआहे. सोपान पाटील यांनी हा वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी केली होती. मात्र रवींद्र पाटील यांनी त्यास नकार दिला होता. त्यावरून सोपान यांनी रवींद्र पाटील यांच्या नावाचे वाशिम, यवतमाळ, वर्धा, सोलापूर, सिंधुदुर्ग या न्यायालयाचे बनावट वॉरंट तयार केले होते. हे वॉरंट त्यांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला पाठविले होते.