बनावट डिग्री प्रकरण पोलिसांत
By Admin | Updated: June 22, 2014 00:37 IST2014-06-22T00:37:04+5:302014-06-22T00:37:04+5:30
अभ्यासक्रमांचे बनावट पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट ) तयार करून सिंगापूरसह इतरही परदेशी कंपन्यामध्ये नोकरीसाठी वापरले असल्याचे निदर्शनास आले आहे

बनावट डिग्री प्रकरण पोलिसांत
>पुणो : पुणो विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांचे बनावट पदवी प्रमाणपत्र (डिग्री सर्टिफिकेट ) तयार करून सिंगापूरसह इतरही परदेशी कंपन्यामध्ये नोकरीसाठी वापरले असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे शेकडो बनावट पदवी प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट अस्तित्वात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे तयार करणा:या व त्यांचा वापर करणा:यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी लेखी तक्रार विद्यापीठातर्फे पोलिसांकडे देण्यात आली आहे.
पुणो विद्यापीठाला’द रिपब्लिक ऑफ सिंगापूर’ यांच्याकडून गुणपत्रके,पदवी,पदविका तसेच बोनाफाईड सर्टिफिकेटस् पडतळणीसाठी प्राप्त झाली होती. या प्रमाणपत्रवर विद्यापीठाच्या काही माजी कुलगुरूंच्या बनावट सह्या व शिक्के असल्याचे दिसून आले. ही बनावट प्रमाणपत्रे परदेशी कंपन्यांमध्ये नोकरीसाठी सादर करण्यात आली होती.परंतु,विद्यापीठाचे वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुधाकर जाधवर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने यासंदर्भातील अभ्यासकरून विद्यापीठाकडे याबाबतचा अहवाल सादर करून याचा तपास पोलिसांकडून करून घेण्याची शिफारस केली होती.
सिंगापूर शासनाकडून पाठविण्यात 79 विद्याथ्र्याचे बोनाफाईट सर्टिफिकेटस्ची तपासणी केल्यानंतर सदर प्रमाणपत्रवर विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचा जावक क्रमांक व अधिका:यांची सही बनावट असल्याचे विद्यापीठाच्या निदर्शनास आले.तसेच 21 विद्याथ्र्याची गुणपत्रके,पासिंग सर्टिफिकेटस् व पदवी प्रमाणपत्रंची तपासणी केली असता ही प्रमाणपत्रे देखील बनावट असल्याचे अढळून आले.
इराण येथील नझीपूर मक्सूद इंसार या विद्याथ्र्याचे कागदपत्रके बनावट असल्याचे कॉन्स्युलेट जनरल ऑफ दी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणला विद्यापीठातर्फे कळविण्यात आले आहे.तसेच जाधवर समितीने विविध कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या 13 विद्याथ्र्याची प्रकरणो तपासली असता सदर विद्याथ्र्याची प्रमाणपत्रे सुध्दा बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे.
पोलीस अधिका-यांच्या मर्यादांचा विचार करता या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून घेणो उचित ठरणार आहे. सिंगापूर व इराणसह इतरही देशांमध्ये अनेक विद्यार्थी बनावट डीग्री प्रमाणपत्रंवर नोकरी करत असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत होणो आवश्यक आहे.
- सुधाकर जाधवर, अधिष्ठाता, वाणिज्य विद्याशाखा, पुणो विद्यापीठ
डॉ. सुधाकर जाधवर समितीने सादर केलेला अहवाल व बीओईमधील चर्चेनुसार या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी,अशी लेखी तक्रार केली आली .
- नरेंद्र कडू, कुलसचिव, पुणो विद्यापीठ