नौदल कमांडरच्या घरी बनावट सौंदर्य प्रसाधने
By Admin | Updated: December 26, 2014 04:41 IST2014-12-26T04:41:09+5:302014-12-26T04:41:09+5:30
मुंबईतील नेव्हीनगरमध्ये वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याच्या घरात ‘बनावट सौंदर्य प्रसाधने’ बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचे एफडीएने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले

नौदल कमांडरच्या घरी बनावट सौंदर्य प्रसाधने
श्रीनारायण तिवारी, मुंबई
मुंबईतील नेव्हीनगरमध्ये वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याच्या घरात ‘बनावट सौंदर्य प्रसाधने’ बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचे एफडीएने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले. तब्बल दोन महिने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला़ मात्र, मंगळवारी अखेर अधिकाऱ्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झालाच़ प्रकरण नौदलाच्या हद्दीतील असल्याने पोलीस व प्रशासन पुढील काळजी घेऊन तपास करीत आहेत़
राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सतर्कता शाखेला नेव्हीनगरमध्ये नौदल अधिकाऱ्याच्या ‘क्वार्टर्स’मध्ये बनावट सौंदर्य प्रसाधन निर्मिती कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली.
प्रकरण नौदनाच्या हद्दीतील असल्याने अन्न व औषध प्रशासनाने थेट कारवाई करण्याऐवजी प्रथम कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली़ त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने ३० आॅक्टोबर २०१४ रोजी छापा टाकला. यामध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात अवैध रसायनांचा साठा जप्त केला होता. या रसायनांची विविध पातळ्यांवर तपासणी सुरूअसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अखेर गुन्हा दाखल
नौदलातील कमांडर दर्जाच्या एका अधिकाऱ्याची पत्नी सीमा सिंग यांच्याविरुद्ध मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात औषधी व सौंदर्य प्रसाधन कायद्यांतर्गत २३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.