बनावट आधार, पॅनकार्ड बनविणाऱ्या तिघांना अटक
By Admin | Updated: June 2, 2017 03:31 IST2017-06-02T03:31:47+5:302017-06-02T03:31:47+5:30
नालासोपारा येथील छाया फोटो स्टुडिओत बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवणाऱ्या टोळीतील तीन जणांना

बनावट आधार, पॅनकार्ड बनविणाऱ्या तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
विरार : नालासोपारा येथील छाया फोटो स्टुडिओत बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवणाऱ्या टोळीतील तीन जणांना तुळींज पोलिसांना अटक केली आहे.
मनोज प्रजापती, रंजित मंडल आणि रामसिंग राजपूत अशी त्यांची नावे आहेत.
ही टोळी अवघ्या दोनशे रुपयांत कोणतेही कार्ड, प्रमाणपत्र बनवून देत असे. पोलीस उपअधीक्षक अनिल काकडे यांनी पथक तयार करून स्टुडिओवर छापा टाकला. या वेळी या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.