बिघाड दुरूस्त, मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू

By Admin | Updated: October 8, 2016 11:47 IST2016-10-08T09:43:24+5:302016-10-08T11:47:53+5:30

तांत्रिक बिघाडमुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक आता दुरूस्तीनंतर सुरळीत सुरू झाली आहे.

Failure to repair, ease of transport of Central Railway | बिघाड दुरूस्त, मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू

बिघाड दुरूस्त, मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरू

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.८ - तांत्रिक बिघाडमुळे विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक आता दुरूस्तीनंतर सुरळीत सुरू झाली आहे. शनिवारी सकाळी कुर्ला रेल्वे स्टेशनजवळ रुळाला तडे गेल्याने सीएसटीकडे जाणारी जलद लोकलची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. यामुळे अनेक एक्स्प्रेसही गाडयांचही वेळापत्रक कोलमडलं. मात्र आता हा बिघाड दुरूस्त झाला असून गाड्या वेळापत्रकानुसार धावत आहेत.
सकाळी सकाळी झालेल्या या बिघाडामुळे कार्यालय गाठण्याच्या घाईत असलेल्या नोकरदारांचे प्रचंड हाल झाले.  कुर्ला स्थानकासह अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. 

Web Title: Failure to repair, ease of transport of Central Railway