शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या योजना पोहोचविण्यात कमी पडलो, ही वेळच आली नसती; मंत्री विजयकुमार गावितांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:19 IST

धुळ्यातील शिरपूरमध्ये गावित यांनी नमो संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मोदींच्या जनतेसाठीच्या योजना पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो, असे म्हटले आहे. 

केंद्र सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची, सांगण्याची जबाबदारी राज्यातील नेत्यांवर देण्यात आली आहे. यासाठी हे नेते प्रचारामध्ये मोदींच्या योजना सांगत आहेत. अशातच राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी अजब विधान केले आहे. 

धुळ्यातील शिरपूरमध्ये गावित यांनी नमो संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी मोदींच्या जनतेसाठीच्या योजना पोहोचविण्यात आम्ही कमी पडलो, असे म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी पाठविलेल्या योजना आम्ही पोहोचवण्यात कमी पडलो. आम्ही या योजना पोहोचवू शकलो असतो तर खूप मोठे काम झाले असते, असे वक्तव्य गावित यांनी केले. या योजना पोहोचल्या असत्या तर अशा बैठका घेत लाभार्थ्यांकडे जा हे करा ते करा करण्याची वेळच आली नसती, अशी देखील कबुली गावितांनी दिली आहे. 

शिरपूर येथे नंदुरबार लोकसभेच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ नमो संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या मेळाव्यादरम्यान मंत्री गावित यांच्या या विधानामुळे सर्वसामान्यांपर्यंत योजना पोहोचविण्यात राज्याचे मंत्री कमी पडले आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :Vijaykumar Gavitविजय गावीतNarendra Modiनरेंद्र मोदीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा