शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीसांचे 'माजी मुख्यमंत्री'पद अल्पकाळ; भैय्याजी जोशींच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 14:28 IST

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर उद्धव यांनी नागरिकता संशोधन कायद्याचे समर्थन केले. मात्र त्यांची ही भेट आणि कायद्याला दिलेले समर्थन चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत कोणत्याच एका पक्षाला मतदारांनी बहुमत न दिल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. शिवसेना-भाजप युतीत लढल्यामुळे सरकार स्थापन करण्यात अशी शक्यता होती. मात्र मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने राष्ट्रवीदी- काँग्रेससोबत जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार लवकरच कोसळणार भविष्यवाणी भाजप नेत्यांकडून नेहमीच करण्यात येते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविषयी असंच वक्तव्य केले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 

भाजपला दूर ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहे. मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस विराजमान होतील, अशी धारणा भाजप नेत्यांची आहे. फडणवीस यांच्याकडे सध्या विरोधीपक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याचवेळी त्यांच्या नावाचे मागे माजी मुख्यमंत्री हे बिरुद लागले. मात्र 'माजी मुख्यमंत्रीपद' हे बिरुद फडणवीसांच्या नावामागे फार काळ राहणार नाही. हे पद त्यांच्या आयुष्यात अल्पकाळ राहिल, असं भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविकास आघाडीचे सरकार कधीही कोसळू शकते, असा अंदाज भाजपच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत व्यक्त केला आहे. तसेच सरकार कोसळले की फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, असंही सांगण्यात येते. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक जोशी यांनीच ही शक्यता वर्तविल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

उद्धव ठाकरेंच्या मोदी भेटीची चर्चामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर उद्धव यांनी नागरिकता संशोधन कायद्याचे समर्थन केले. मात्र त्यांची ही भेट आणि कायद्याला दिलेले समर्थन चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेना पुन्हा भाजपच्या जवळ तर जाणार नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.