शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

Fadnavis in Davos: विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर, सांगितले दावोस दौऱ्याचे महत्त्व; म्हणाले, "ज्या प्रकारच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:40 IST

दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिष्टमंडळासह सहभागी झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले. 

दावोस दौऱ्यावरून होत असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले. दावोस येथून संवाद साधत त्यांनी सध्याची भू-राजकीय परिस्थिती, आर्थिक घडामोडी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील सहभाग याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दौऱ्यात झालेल्या करारामुळे महाराष्ट्रात येऊ घातलेल्या गुंतवणुकीबद्दलही माहिती दिली.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधून बोलताना म्हणाले की, "पहिल्यांदा तर मला हे सांगायचं आहे की, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमधील सहभाग का गरजेचा आहे. आपल्याला कल्पना आहे की, आजच्या भू राजकीय परिस्थितीत ज्या प्रकारच्या आर्थिक घडामोडी घडत आहेत. त्या घडामोडींमध्ये तुम्हाला जर सुंसगत राहायचे असेल, तर तुम्हाला दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये असले पाहिजे."

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, "जगातील राजकीय नेते इथे आहे. जगातील उद्योगांचे नेतृत्व करणारे इथे आहेत. जगातील नवीन शोध या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता या ठिकाणी दाखवण्यात आल्या आहेत. जगाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, हे आपल्याला इथे शिकायला आणि त्यात सहभागी व्हायला देखील मिळते."

"देशाचे ग्रोथ इंजिन असलेला महाराष्ट्र वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलेच पाहिजे. ती संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. याठिकाणी दोन गोष्टी असतात. एक आपला सहभाग असतो. ज्यात द्विपक्षीय बैठका होतात. उद्योगपतींसोबत बैठका होतात. वेगवेगळ्या संवादात भाग घेऊन आपल्याला भारताची आणि आपल्या राज्याची भूमिका मांडता येते. त्या क्षेत्रातील जे जे नवीन घडत आहोत, त्यात आपण सध्या कुठे आहोत, या गोष्टी आपल्याला सांगता येतात. त्याचबरोबर अनेक गुंतवणुकीचे करारही याठिकाणी होतात", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis defends Davos trip, highlights its importance amid criticism.

Web Summary : Amid criticism, Fadnavis justified his Davos visit, emphasizing its importance in understanding global economic shifts and attracting investment to Maharashtra through key agreements.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSwitzerlandस्वित्झर्लंडInvestmentगुंतवणूक