शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

राज्यातील कारखान्यांना ऊसासाठी करावी लागणार धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 13:24 IST

दसरा व दिवाळीच्या आसपास साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असतात. परंतु अनेक साखर कारखाने या वर्षी बंद राहणार आहेत.

ठळक मुद्देदुष्काळाचा, पुराचा परिणाम : हंगामाचा ऊस नेला गुऱ्हाळ अन् रसवंतीगृहांनी

रांजणगाव सांडस :  भीमा व मुळा-मुठा नदीच्या काठावरील गावांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला. यात पिकांचे मोठे नुकसान झाले. सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला. शेतकऱ्यांनी पाण्याअभावी ऊस गुऱ्हाळे यांना ३००० ते ३५०० बाजार भाव प्रतिटनप्रमाणे दिल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उसाचे हक्काचे चार पैसे मिळाले असले तरी कारखान्यांकडून मिळणारे एकरी टनेज न मिळाल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. सध्या उसाचे प्रमाण कमी असल्याने कारखान्यांना मात्र ऊस मिळवण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे. दसरा व दिवाळीच्या आसपास अनेक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत असतात. परंतु अनेक साखर कारखाने या वर्षी बंद राहणार आहेत. कारण हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्याला ऊस कमी पडणार आहे. याला कारण आहे, दुष्काळजन्य परिस्थिती व रसवंतीगृह व गूळ बनविणारे गुऱ्हाळ.. त्यांनी साखर कारखान्यांपेक्षा जास्त व एकरकमी बाजारभाव दिल्यामुळे साखर कारखाने सुरू होतील तोपर्यंत ऊस ठेवला नाही. कारण कारखान्यांचा बाजार हप्त्यामध्ये  अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस रसवंतीगृहाला दिलेला आहे. त्यामुळे अनेक  शेतामध्ये उसाचे टिपरूही शिल्लक राहिलेले नाही.   सहकारी साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने  ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांचा ऊस हे कारखान्याच्या क्षेत्राबाहेरील अनेक कारखाने शेतकऱ्यांचा ऊस गळीत हंगामासाठी नेत होते. त्यामुळे  साखर कारखानदारी अडचणीत नव्हती. जिल्ह्यातील साखर कारखाने बाजारभाव देण्यासाठी नेहमी स्पर्धा करत असे, परंतु अलीकडील काळामध्ये कमी झालेले पर्जन्यमान, खासगी साखर कारखानदारी तसेच मोठ्या प्रमाणात गुऱ्हाळ मालक आणि परराज्यांतील रसवंतीगृहांकडून उसाची वाढलेली मागणी, यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला मोठी मागणी आहे. यामुळे गाळपासाठी आवश्यक असलेला ऊस पळवण्यात येऊ लागल्यामुळे कारखान्यांनाच ऊस कमी पडायला लागला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती व कारखान्यांचे बाजारभाव कमी-जास्त प्रमाणात देण्यामागचे हे कारण आहे. आजही शेतकऱ्यांना पाण्याची समस्या सोडवता आलेली नाही. चासकमानचे आवर्तन शिरूर तालुक्यात सुटल्यानंतर शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेततलाव हे धरणातील सुटलेल्या पाण्याच्या विसर्गातून  भरले गेले असते तर अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न मिटला असता. परंतु धरणातील अतिरिक्त पाणी हे नद्यांमध्ये सोडल्यामुळे पाणी आले. नदीला पूर आला, पूर वाहून गेला, परंतु शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाहण्यासाठी पाणी शिल्लक राहिलेले आहे.  ...........चासकमान धरणाच्या पाण्याचे व घोड धरणाच्या पाण्याचे योग्य वाटपाचे  नियोजन न झाल्यामुळे शिरूर तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर शेतकऱ्यांनी आपला कमी वयाचा ऊस गुऱ्हाळे, रसवंतीगृहांना दिला नसता .- अशोक पवार, माजी आमदार .............सहकारी साखर कारखानदारी वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने साखरेला हमी भाव द्यावा. शेतकरीवर्गाला यातून हक्काचे चार पैसे मिळतील. - सुधीर फराटे पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष व संचालक,  घोडगंगा साखर कारखाना ............

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती