शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी राजकारणासाठी वापरल्याने कारखाने रसातळाला : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 11:18 IST

अडचणीत येतात तेव्हा शेतकऱ्यांना त्याग करायला सांगतात आणि चांगले दिवस आले की लुटतात.

ठळक मुद्दे‘सहकारी साखर कारखानदारीपुढील आव्हाने आणि उपाययोजना’विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे सगळी बंधने सहकाराला आणि खासगीला मोकळे रान हे बरोबर नाहीशेतकऱ्यांची चळवळ उभी राहिली पाहिजे

सोमेश्वरनगर : कारखाने बुडतात तेव्हा चालकाने दोन्ही खिसे भरून घेतलेले असतात. शेतकरी वाऱ्यावर सोडले जातात. प्यायला पाणी नाही, तिथे कार्यकर्ता सांभाळण्यासाठी कारखाने दिले गेले. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याऐवजी राजकारणासाठी वापरल्याने कारखाने रसातळाला गेले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. येथील मु. सा. काकडे महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य, गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत ‘सहकारी साखर कारखानदारीपुढील आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावर आयोजित  दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते सतीश काकडे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. महादेव वाळुंज, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. जया कदम, डॉ. देविदास वायदंडे, कल्याण भगत, नितीन कुलकर्णी, संजय घाडगे, विलास बोबडे, कैलास मगर, अविनाश जगताप, दत्तात्रेय भोईटे उपस्थित होते.  खासदार शेट्टी म्हणाले,  पंचवीस हजारांची सभा शक्य नसेल तर एक हजारामागे एक-दोन प्रतिनिधी घेऊन वरचेवर चर्चा करावी. अडचणीत येतात तेव्हा शेतकऱ्यांना त्याग करायला सांगतात आणि चांगले दिवस आले की लुटतात. एफआरपीचे तुकडे करण्यासाठी गुपचूप करार करतात. तेव्हा सरकार बघ्याची भूमिका घेतं. दुबळ्या लोकांकडून लिहून घेऊन एफआरपीचा कायदा मोडणारांना दरोडेखोर का म्हणू नये? व्हीएसआयमधील चर्चासत्रात चोºया उघड होतील म्हणून चळवळीतल्यांना बोलवत नाहीत, असा आरोप करत ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबविणे गरजेचे आहे; अन्यथा भविष्यात ऊसतोडणीसाठी कामगार मिळणे मुश्किल होईल, असे शेट्टी म्हणाले.    सतीश काकडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, चंगळवादी वृत्ती मोडून काटकसरी बनले पाहिजे. सत्तेचा माज येऊ देता कामा नये. शेतकऱ्यांची पोरे सत्तेत जाऊन शेतकऱ्यांना विसरतात. ९७ व्या घटनादुरुस्तीत बदल हवा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सर्व कारखान्यांनी प्रतिटन निधी द्यावा. या वेळी संतोष शेंडकर यांचे भाषण झाले.माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, शंभर सहकारी साखर कारखाने उत्तम चालतात. त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. सगळी बंधने सहकाराला आणि खासगीला मोकळे रान हे बरोबर नाही. यासाठी १९६० च्या जुनाट सहकार कायद्यात काळानुरूप बदल झाले पाहिजेत. ...........शेतकऱ्यांची चळवळ उभी राहिली पाहिजेशेतकऱ्यांचीच मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे. चळवळच फक्त चोऱ्यांवर अंकुश बसवते. प्रशासन घाबरवते आणि सरकारवर दबाव ठेवू शकते. तेल, तेलबिया, डाळी आयात केल्याने रुपयाचे अवमूल्यन होत आहे. शेतकºयालाच खात्रीचे पैसे दिले तर ही आयात करावी लागणार नाही. तेल कंपन्यांचा इथेनॉलच्या धोरणात अडसर आहे. मधल्यांचे खिसे भरणारी धोरणे मोडून काढली पाहिजेत. अंकुश ठेवणारा तगडा नेता केंद्रात हवा.

टॅग्स :BaramatiबारामतीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखानेPoliticsराजकारणFarmerशेतकरीGovernmentसरकार