वॉटर फिल्टर पुरवठ्याची वस्तुस्थिती
By Admin | Updated: June 30, 2015 02:40 IST2015-06-30T02:40:58+5:302015-06-30T02:40:58+5:30
२९ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीजने खालील खुलासा केला आहे. वॉटर फिल्टर कम प्युरिफायर या वस्तूचा रेट कॉन्ट्रॅक्ट उद्योग संचालनालयाने केलेला आहे.

वॉटर फिल्टर पुरवठ्याची वस्तुस्थिती
मुंबई : २९ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीजने खालील खुलासा केला आहे.
वॉटर फिल्टर कम प्युरिफायर या वस्तूचा रेट कॉन्ट्रॅक्ट उद्योग संचालनालयाने केलेला आहे. सदर रेट कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी जाहीर ई-टेंडरिंगचा वापर करण्यात आला होता. सदरची ई-टेंडर प्रक्रिया ही दिनांक १९/८/२०१४ ते २८/१/२०१५पर्यंत चालू होती. या ई-टेंडरमध्ये मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, गंगापूर यांनी मे. योग व्हॅली कं. वडोदरा (गुजरात) या वॉटर फिल्टर मॅन्युफॅक्चररचे डिस्ट्रिब्युटर (वितरक) म्हणून ई-टेंडर भरले होते. मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज यांच्या सर्व शासकीय नोंदणी प्रमाणपत्रांमध्ये रिसेलर असल्याचे नमूद केलेले आहे.
उद्योग संचालनालयास प्राप्त झालेल्या सर्व टेंडरमधून मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज यांचे दर सर्वांत कमी आल्यामुळे त्यांचा रेट कॉन्ट्रॅक्ट उद्योग संचालनालयाने केलेला होता.
उद्योग संचालनालयाने केलेल्या मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज यांच्या रेट कॉन्ट्रॅक्टरमध्ये २५ लि. स्टोरेज टाईप वॉटर फिल्टर कम प्युरिफायरचा दर रुपये ५२२०/- असा आहे व त्या दरानुसारच आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीजला पुरवठा
आदेश दिलेला आहे. त्यानुसार मे. योग व्हॅली, वडोदरा (गुजरात) या कंपनीचे वितरक मे. एव्हरेस्ट इंडस्ट्रीज, गंगापूर यांनी वॉटर फिल्टरचा अंगणवाड्यांसाठी पुरवठा केलेला आहे. (प्रतिनिधी)