यशोमती ठाकूर यांचे फेसबुक, ई-मेल अकाउंट हॅक
By Admin | Updated: September 8, 2014 02:40 IST2014-09-08T02:40:18+5:302014-09-08T02:40:18+5:30
तिवस्याच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचे फेसबुक आणि ई-मेल अकाउंट हॅक करण्यात आल्याची धक्कादायक बाब रविवारी उघडकीस आल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.

यशोमती ठाकूर यांचे फेसबुक, ई-मेल अकाउंट हॅक
अमरावती : तिवस्याच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचे फेसबुक आणि ई-मेल अकाउंट हॅक करण्यात आल्याची धक्कादायक बाब रविवारी उघडकीस आल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली.
यशोमती ठाकूर यांनी अमरावती शहर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सायबर क्राइम सेलने तातडीने तपास सुरू केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचे फेसबुक व ई-मेल अकाउंट हॅक झाल्यामुळे त्याचे वेगवेगळे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. अमरावती जिल्ह्यातील आमदारांमध्ये सोशल मीडियाचा प्रभावीपणे व सर्वाधिक वापर यशोमती ठाकूर यांच्याद्वारेच केला जातो. फेसबुकवर त्यांच्या चाहत्यांची संख्या इतरांच्या तुलनेत अधिक आहे. अकाउंट हॅक झाल्याची तक्रार प्राप्त झाली़ तथापि, या प्रकरणाचा निवडणुकीशी कुठलाही संबंध नाही. तपास सुरू आहे. गुन्हेगार लवकरच जेरबंद होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)