शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

“काचेवर हात आपटत होते प्रवासी, मदत मिळेना; लहान बाळ डोळ्यासमोर बघता बघता...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 13:35 IST

समृद्धी महामार्गावरील दुर्दैवी अपघातात अंगावर शहारे आणणाऱ्या काही गोष्टी प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे म्हटले जात आहे.

Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. बसमध्ये एकूण ३३ प्रवासी होते. यामधील आठ प्रवासी सुखरुप आहेत. या महामार्गावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी या अपघातग्रस्तांची वेळीच मदत केली असती, तर आणखीही जीव वाचले असते, असा दावा घटनास्थळी बचावकार्य करणाऱ्या काहींनी केला आहे. 

अपघातानंतर बसच्या मागील बाजूच्या खिडकीच्या काचांवर हात आपटून काही प्रवासी मदतीसाठी गयावया करत होते. पण आजूबाजूने जाणारे इतर वाहन चालक मदतीसाठी थांबले नाहीत, असा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. आपल्या डोळ्यांदेखतच एका बाळाचा जळून मृत्यू झाल्याचे एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले आहे.

एक महिला बाळासह काचेवरती हात आपटत सुटकेची याचना करत होती...

आग लागल्यामुळे आतून प्रवाशांना काचा फोडणे शक्य झाले नाही. परंतु आजूबाजूने जाणारे ट्रक, टेम्पो आणि इतर चालक थांबले नाहीत, त्यांनी आपल्याकडील लोखंडी रॉडने काचा फोडण्यास मदत केली असती, तर मृतांचा आकडा कमी असता,असे काहींनी म्हटले आहे. तर बसच्या मागील बाजूला एक महिला आपल्या बाळासह काचेवरती हात आपटत आपटत सुटकेची याचना करत होती, मात्र आमच्या डोळ्यांदेखतच त्यांचा जळून कोळसा झाला, असे ते म्हणाले

दरम्यान, या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दुसरीकडे,  या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाखांची मदत दिली जाणार आहे आणि जखमींना ५० हजारांची मदत केली गेली आहे. 

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात