नागपुरात सहा दिवसांच्या चिमुकलीचे नेत्रदान
By Admin | Updated: November 28, 2014 01:45 IST2014-11-28T01:45:08+5:302014-11-28T01:45:08+5:30
सहा दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात घटली.

नागपुरात सहा दिवसांच्या चिमुकलीचे नेत्रदान
नागपूर : सहा दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरच्या शासकीय रुग्णालयात घटली. पण तिच्या पालकांनी त्या चिमुकलीचे डोळे दान करण्याचा निर्णय घेत जगासमोर आदर्श ठेवला आहे.
संसाराच्या वेलीवर एक सुंदर फूल उमलले. सारी स्वप्ने मातेच्या डोळ्यांत होतीच; पण नियतीने क्रूर डाव खेळला. जन्माला आल्यावर डोळे उघडण्यापूर्वीच त्या चिमुकलीला अवघ्या सहाव्या दिवशीच या जगाचा निरोप घ्यावा लागला. दीपक सुरेश नरांजे आणि दीक्षापाली यांचे हे पहिलेच अपत्य होते. पण त्या चिमुकलीच्या वडिलांनी मात्र तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान बाळाचा जन्म झाल्यावर ते रडले नसल्याने मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता तर फुप्फुसात संसर्ग झाला होता. त्या चिमुकलीला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांनी केले. पण तिचा आज सायंकाळी मृत्यू झाला. (प्रतिनिधी)