पनवेलमध्ये चिमुकलीवर अतिप्रसंग
By Admin | Updated: December 28, 2014 01:07 IST2014-12-28T01:07:34+5:302014-12-28T01:07:34+5:30
मुंबई पाहण्यासाठी आईबरोबर आलेल्या पाच वर्षांच्या मुलीशी अतिप्रसंग केल्याची घटना पनवेल येथे घडली. याप्रकरणी पोलीसांनी दोन सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे.

पनवेलमध्ये चिमुकलीवर अतिप्रसंग
नवी मुंबई : मुंबई पाहण्यासाठी आईबरोबर आलेल्या पाच वर्षांच्या मुलीशी अतिप्रसंग केल्याची घटना पनवेल येथे घडली. याप्रकरणी पोलीसांनी दोन सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. या मुलीची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिची आई मुंबईत नोकरीच्या शोधात होती. त्याचाच फायदा या सुरक्षारक्षकांनी घेतला.
मुळची सोलापूरची असलेली ही मुलगी आईसोबत मुंबई पाहण्यासाठी आली होती. ती पनवेल येथे मावशीच्या घरी राहत होती. तिची आई तात्पुरत्या नोकरीच्या शोधात होती. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर तिला पनवेलमधील सदाशिव सोसायटीत एका कुटुंबाला घरकाम करणारी महिला पाहिजे असल्याचे समजले. परंतु हे कुटुंब बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांच्या परत येण्याबाबतची विचारपूस तिच्या आईने सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांकडे केली. २२ डिसेंबरला ही महिला आपल्या ५ वर्षीय मुलीला सोबत घेऊन पुन्हा तिथे गेली.
यावेळी सोसायटीचे सुरक्षा रक्षक शिवमंडी पांडे (२५) व श्रीकांत पांडे (३५) तिथे होते.
या दोघांनी चौकशीच्या बहाण्याने महिलेला इमारतीतील एका मोकळ्या खोलीमध्ये नेले. त्यावेळी तिची
मुलगी इमारतीच्या आवारातच खेळत होती. शिवमंडी पांडे महिलेची विचारपूस करत असताना श्रीकांत बाहेर गेला होता. काही वेळाने तो परत आल्यानंतर शिवमंडी बाहेर गेला. त्यानंतर ती महिला मुलीला घेऊन घरी गेली.
महिला त्या खोलीत असताना दोन्ही सुरक्षारक्षकांनी तिच्या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला होता. परंतु भीतीमुळे मुलीने याची वाच्यता आईकडे केली नव्हती. मात्र दोन दिवसांनी या मुलीची प्रकृती बिघडली. अखेर २५ डिसेंबरला तिने या प्रकाराची माहिती आईला दिली. त्यानुसार मुलीच्या आईने पनवेल शहर पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार शिवमंडी पांडे व श्रीकांत पांडे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर ३७६, ५०६ व ३२३ कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)