शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा आरक्षणासंबंधी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात नवीन आदेश काढू’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 07:02 IST

मराठा आरक्षणासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्याबाबत काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या हरकती असल्याने, त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यास लवकरच नवा आदेश काढू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली.

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्याबाबत काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या हरकती असल्याने, त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यास लवकरच नवा आदेश काढू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. नवीन आदेश काढेपर्यंत खुल्या प्रवर्गातील एकाही  कर्मचाºयाला सेवेतून काढणार नाही, असे आश्वासन राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. अक्षय शिंदे यांनी न्या. रणजीत मोरे व न्या. एन. एम. जामदार यांच्या खंडपीठाला दिले.मराठा आरक्षणासंबंधी कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्यासंदर्भात सरकारने ११ जुलै रोजी काढलेल्या अधिसूचनेला काही सरकारी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याविरोधात निकाल दिला असतानाही, राज्य सरकारने ११ जुलै रोजी ही अधिसूचना काढली कशी? या उच्च न्यायालयाच्या प्रश्नावर सरकारी वकिलांनी राज्य सरकार या वादावर तोडगा काढण्यासाठी नवा आदेश पारित करणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली.हा वाद उच्च न्यायालयाच्या २०१५ व २०१९ मध्ये दिलेल्या वेगवगेळ्या आदेशांमुळे निर्माण झाला आहे. सरकारी नोकरी व शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला तत्कालीन मुख्य न्यायाधीश मोहीत शाह यांनी २०१५ मध्ये स्थगिती दिली.२७ जून रोजी उच्च न्यायालयाने मराठा समाजाला सरकारी नोकºयांत व शिक्षण क्षेत्रात आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय योग्य ठरविला. राज्य सरकारने या निर्णयाच्या आधारावर ११ जुलै रोजी अधिसूचना काढून, मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू केले व सरकारी नोकºयांत तात्पुरत्या स्वरूपी भरण्यात आलेल्या खुल्या प्रवर्गातील कर्मचाºयांची सेवा निष्कासित करण्याचा आदेश दिला.या अधिसूचनेमुळे राज्यातील २,७०० खुल्या प्रवर्गातील कर्मचाºयांवर परिणाम होईल. मराठा आरक्षणासंदर्भातील कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा सरकारचा निर्णय बेकायदा आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCourtन्यायालय