एसटी महामंडळाकडून जादा गाड्या
By Admin | Updated: March 6, 2017 00:50 IST2017-03-06T00:50:42+5:302017-03-06T00:50:42+5:30
राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) पुणे व पिंपरी- चिंचवड येथून दि. ८ ते १२ मार्चदरम्यान ३० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळाकडून जादा गाड्या
पिंपरी : होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) पुणे व पिंपरी- चिंचवड येथून दि. ८ ते १२ मार्चदरम्यान ३० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच, तुकाराम बीजेनिमित्तही देहूला जाण्यासाठी जागा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोकणात जाण्यासाठी पुण्याहून १६, तर पिंपरी-चिंचवड येथून १४ बस असणार आहेत. या गाड्या चिपळूण, माणगाव, गुहाघर, खेड आणि पोलादपूर या ठिकाणी सोडल्या जाणार आहेत. या गाड्या दि. ८ ते १२ मार्च या कालावधीत स्वारगेट येथून दररोज रात्री ९ वाजून ११ मिनिटांनी चिपळूणसाठी (सातारामार्गे) आणि रात्री ९ वाजता गुहागरसाठी (चिपळूणमार्गे) सोडल्या जातील. तर, १० व ११ मार्च रोजी सकाळी ६ वाजून ११ मिनिटांनी आणि दि. १२ मार्चला ६ वाजून ४१ मिनिटांनी खेडसाठी (भोरमार्गे) गाडी असेल. तसेच, माणगावसाठी (दापोलीमार्गे) १० ते १२ मार्चदरम्यान दररोज रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी गाडी सोडण्यात येईल.
पिंपरी-चिंचवड येथून चिपळूणसाठी (सातारामार्गे) दि. ९ ते १२ मार्चदरम्यान रात्री ९ वाजून ४६ वाजता, दि. १० ते १२ मार्चदरम्यान सकाळी ११.३० वाजता चिपळूणसाठी (सातारामार्गे), दि. ८ ते १२ मार्चदरम्यान रोज रात्री १० वाजून १६ मिनिटांनी पोलादपूरसाठी गाडी सोडण्यात येईल. (प्रतिनिधी)
तुकाराम बीजेनिमित्त दि. १४ मार्च रोजी देहूला जाण्यासाठी दि. १३ ते १५ मार्च या कालावधीत देहू आणि आळंदीसाठी ज्यादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
स्वारगेट, शिवाजीनगर, बारामती, भोर, शिरूर, नारायणगाव, राजगुरूनगर, तळेगाव, इंदापूर, सासवड, दौंड व पिंपरी-चिंचवड येथून सोडण्यात येईल.